महेंदीतून चढला आर्थिक सुबत्तेचा रंग

महेंदीतून चढला आर्थिक सुबत्तेचा रंग

पुणे, ता. २५ : लग्न असो वा सण, महिला वर्गाची धाव असते ती सौंदर्य खुलविण्याकळे. त्यासाठी परिधान केले जाणारे कपडे, श्रृंगार यासह मेहंदीला तितकंच प्रधान्य दिले जातं. अलीकडे मेहंदीची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता बाजारपेठांमध्ये हव्या त्या डिझाईन हवे तशी मेहंदी काढून देणाऱ्या दुकानांची संख्या वाढत आहे. यामुळे मेहंदी कलाकारांना रोजगार उपलब्ध होत आहे.
नेल आर्ट स्टुडिओ प्रमाणे आता शहरात मेहंदी स्टुडिओ उपलब्ध आहेत. याबाबत कोथरूड येथील मेहंदी स्टुडीओ असलेले सोनू कश्‍यप म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशच्या आग्र्या जवळ माझे गाव आहे. मेहंदी काढण्याच्या कामासाठी काही वर्षांपूर्वी पुण्यात आलो. मेहंदी काढण्याची कला ही दिल्लीमध्ये शिकलो. सुरवातीला अगदी छोट्याशा दुकानातून काम सुरू केले. पण मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मेहंदी स्टुडिओपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या होऊ शकला. यामुळे उत्पन्न ही चांगले मिळत असून अनेक मेहंदी काढणाऱ्या कलाकारांना रोजगार उपलब्ध करून देता येत आहे. गेल्या १३ वर्षांपासून पुण्यात मेहंदी काढण्याचे काम करत आहे. सध्या स्टुडिओत १५ मेहंदी आर्टिस्ट कार्यरत आहेत. एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये तर मेहंदी काढणाऱ्या कलाकारांची मागणी वाढते.’’

इंस्टंट मेहंदीची निवड
नोकरी आणि इतर कामांमुळे वेळेअभावी मेहंदी काढणे शक्य नसल्याने इंस्टंट मेहंदीचा पर्याय निवडला जातो. इंस्टंट मेहंदीमुळे अवघ्या काही मिनिटांमध्येच मेहंदीचा रंग उठून येतो. यामुळे सायंकाळच्या कार्यक्रमाचे नियोजन असल्यास, सकाळी किंवा दुपारी मेहंदी काढली जाते. अशा मेहंदीकडे महिलांचा कल वाढत आहे.

हल्ली बाजारात अशी कित्येक दुकाने असतात जिथे मेहंदी काढून देतात. त्यात त्यांच्याकडे एक से एक मेहंदीच्या डिझाईन उपलब्ध असल्याने आपल्याला हवी तशी मेहंदी काढून घेता येते. स्वतः मेहंदी काढताना वेळ जातो, शिवाय घरातील इतर कामेही असतात. त्यामुळे दुकानातून मेहंदी काढणे सोईस्कर आहे.
- लतिका चव्हाण, धायरी

डिझाईनचे प्रकार
राजस्थानी, मारवाडी, अरेबियन, बॉम्बे कट, ब्राईडल मेहंदी

दृष्टिक्षेपात
- ५० रुपयांपासून ते ५ हजारांच्या पुढे मेहंदी काढण्याचे दर
- डिझाईन, प्रकारानुसार दर
- हाताच्या कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढण्याची सर्वाधिक पसंती
- मेहंदीबरोबर नेल आर्टची सुविधा असलेल्या स्टुडिओची निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com