पुण्यात चार घरफोड्यांत
१२ तोळ्यांचे दागिने लंपास

पुण्यात चार घरफोड्यांत १२ तोळ्यांचे दागिने लंपास

पुणे, ता. २३ : शहराच्या पूर्व भागातील चंदननगर, येरवडा आणि कोंढवा परिसरात चार घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये घडलेल्या या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी १२ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली.
चोरट्यांनी बेडरूममधील स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचा काढून लॉकरमधून आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी केले. कोंढवा खुर्द येथील भाग्योदयनगरमधील तैमूर सोसायटीमध्ये मंगळवारी (ता. २१) ही घटना घडली. याबाबत सदफ जहीर शेख (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रांतवाडी येथील पोलिस लाइनमधील दोन सदनिकांमधून चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (ता. १९) रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. फिर्यादी गजानन मोहन चव्हाण (वय ३०, रा. विश्रांतवाडी पोलिस लाइन) हे जालना येथे गेले होते. त्यावेळी चोरट्याने घराचे कुलूप तोडून दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच, अन्य एका घटनेत चोरट्याने स्वामी राठोड यांच्या घरातून चांदीचे दागिने आणि रोकड लांबवली.
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून २४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले. ही घटना मंगळवारी (ता. २१) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खराडी येथील शिववेद अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी आशिष राजू केवट (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com