पुणेकरांसाठी ‘हेल्दी पुणे’

पुणेकरांसाठी ‘हेल्दी पुणे’

पुणे, ता. २४ : महापालिकेच्या नऊ हजार ५०५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात ५०५ कोटी रुपये आरोग्य विभाग विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. पुणेकरांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असून, त्या अंतर्गत ‘हेल्दी पुणे’ योजना राबविण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
कोरोना उद्रेकानंतर पुण्याच्या आरोग्यावर भर देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. त्यासाठी ५०५.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘हेल्दी पुणे’ ही योजनेसाठी पाच कोटी रुपयांची देण्यात आले आहेत. नवीन आर्थिक वर्षापासून ही योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. अंतर्गत वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. वारजाच्या प्रभाग क्रमांक ३० मध्ये खासगी संस्था किंवा धर्मादाय न्यास अशा संस्थांच्या भागीदारीतून ‘डिझाईन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) तत्त्वावर ३० वर्षे कराराने चालविण्यास देण्यात येणार आहे. तेथे सुमारे ३५० खाटांचे रुग्णालय उभारता येईल. यात दाखल होणाऱ्या रुग्णांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतील (सीजीएचएस) दराप्रमाणे उपचार मिळतील. यात रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे आणि कुशल मनुष्यबळ हे निविदा धारकाकडूनच उपलब्ध करण्यात येणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय
पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय उभारण्यात येणार आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयातील उपकरणे, यंत्रे, स्वच्छता यासाठी ६२.७३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

केपीटीसी मॉल रुग्णालय
वानवडी येथील महापालिकेचे केपीटीसी मॉल हे शंभर खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यात ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग अशा सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज केले आहे.

बालस्नेही रुग्णालय
पुणे शहर हे लहान मुले आणि त्यांच्या पालकांसाठी सुसज्ज बनविणे हा अर्बन ९५ या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. येरवडा येथील छत्रपती शिवराय रुग्णालयात अर्बन ९५ प्रकल्पांतर्गत बालस्नेही रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

भटक्या कुत्र्यांची गणना
भटक्या व मोकाट कुत्र्यांची गणना करणारी पुणे ही राज्यातील एकमेव महापालिका आहे. त्यासाठी स्वतंत्र ॲप विकसित करून ही गणना करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com