न्यू हॉलंड अॅग्रिकल्चरतर्फे फिरता दवाखाना

न्यू हॉलंड अॅग्रिकल्चरतर्फे फिरता दवाखाना

पुणे, ता. २४ ः सीएनएच उद्योगाचा एक भाग असलेल्या न्यू हॉलंड अॅग्रिकल्चरने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत पुणे आणि परिसरात फिरता वैद्यकीय दवाखाना (एमएमडी) सुरू केला आहे. पुण्याच्या ३५-४० किलोमीटरच्या परिघात गरजू लोकांना हा दवाखाना मूलभूत आरोग्य सेवा पुरवेल. या उपक्रमाद्वारे दरवर्षी १५ हजारांहून अधिक व्यक्तींना लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे.
मेडिहेल्प फाउंडेशनद्वारे संचलित एमएमडी रक्तातील ग्लुकोज चाचणीसह ‘पॉइंट ऑफ केअर डायग्नोस्टिक्स’ म्हणजे रुग्णापाशी जाऊन चाचणीची सुविधा पुरवेल. हा फिरता दवाखाना वाशिरे, तरडेवाडी, भरतेवाडी, कडलकवाडी, गणेशवाडी, देशमुख, करवंदेवाडीसह इतर २० हून अधिक वाड्यावस्त्यांना भेट देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com