एसटीतून तीन लाख महिलांचा प्रवास

एसटीतून तीन लाख महिलांचा प्रवास

पुणे, ता. २४ : राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला पुणे विभागातील ग्रामीण भागात सर्वाधिक चांगला प्रतिसाद लाभला. मागील सात दिवसांत पुणे विभागात ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी प्रवास केला. यातून महामंडळाला सुमारे ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. १७ ते २३ मार्च दरम्यानची ही आकडेवारी असून सर्वात जास्त नारायणगांव आगारातून महिलांनी प्रवास केला. नारायणगांवमध्ये या सात दिवसांत ५२ हजार ८८ महिला प्रवाशांनी प्रवास केला.

राज्य परिवहन महामंडळाने महिला सन्मान योजनेला १७ मार्चपासून सुरुवात केली. यात अर्ध्या तिकीट दरात महिलांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. येत्या काळात एसटीचा उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू होत आहे. यात प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून एसटी महामंडळाला ८९ लाख १४ हजार १३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

आगार व प्रवासी संख्या
शिवाजीनगर - १६ हजार ९०२
स्वारगेट - १५ हजार ५५८
भोर - २७ हजार १९२,
नारायणगांव - ५२ हजार ८८
राजगुरुनगर - ४१ हजार ५३१
तळेगाव - १४ हजार १०५
शिरूर - १९ हजार ५२२
बारामती - ४० हजार ९५२
इंदापूर - ३२ हजार ३०९
सासवड -१५ हजार ८१७
दौंड - १० हजार २५६
पिंपरी-चिंचवड - ८ हजार ९९६
एमआयडीसी - १४ हजार ९१०
एकूण - ३ लाख १० हजार १३८

महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला महिला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला आता एसटीने प्रवास करण्यावर भर देत आहेत. यामुळे त्याचा प्रवास सुरक्षित व किफायतशीर होत आहे.
- कैलाश पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com