मुस्लिम बांधवांची दिनचर्या म्हणजे नैतिकतेचा महोत्सवच !

मुस्लिम बांधवांची दिनचर्या म्हणजे नैतिकतेचा महोत्सवच !

रमजानच्या उपवासासाठी सूर्योदयापूर्वी (सेहरीं) व सूर्यास्तापर्यंत (इप्तारी) काहीही खाता येत नाही. एवढेच नव्हे, तर पाणी देखील पिता येत नाही. आपली कोणतीही कृती परमेश्वर पाहतो, अशी इस्लाम धर्मीयांची गाढ श्रद्धा असते व त्यामुळे उपवास धारकाचा पाण्याअभावी जीव कासावीस झाला व तो एकटाच आहे, त्याला पाहणारे कुणीही नाही, तरीदेखील तो केव्हाही पाणी पिणार नाही, ही ताकद आहे र्इश्वराच्या प्रती असणाऱ्या प्रितीची, निष्ठेची व श्रद्धेची!
वर्षातून एक महिना (रमजान) प्रत्येक मुस्लिमाने उपवास करायचा असतो. उपवास सुरू असताना कोणाचेही मन दुखवू नये, कोणाचेही नुकसान करू नये, मनात वार्इट विचार येऊ देऊ नयेत, वगैरे अटी उपवास करताना पाळाव्या लागतात. आजारी माणसे, प्रवासी आणि लहान मुले यांनी उपवास केलाच पाहिजे, अशी अट नाही.
पवित्र कुराणच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक सज्ञान मुस्लिम स्त्री-पुरुषाने या पवित्र रमजानच्या महिन्यात पाच वेळची प्रार्थना (नमाज), पवित्र कुराण पठण, जप-ध्यान (एतकाफ, जिकर) व रात्रीची विशेष प्रार्थना (तराविहची नमाज) करावयाची असते.
उपवास असणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असा प्रसंग आला की, त्याच्यामध्ये क्रोध (राग) निर्माण झाला व आता काही अनर्थ घडणार आहे, तर अशा वेळी त्या उपवास धारकाने लगेच जाहीर करावे की, माझा रमजानचा उपवास आहे आणि या काळात भांडण-तंटा करण्याची मला र्इश्वराची आज्ञा नाही. कुणीही उपवासधारक सत्य लपवू शकत नाही व खोटे बोलू शकत नाही आणि म्हणूनच आपण अनेक वेळा पाहतो की, रमजानच्या पवित्र महिन्यात काही मुस्लिम/इस्लामिक देश युद्धजन्य परिस्थितीत बिनशर्त माघार घेतात व त्यांची खात्री असते की, त्यांना अल्लाहची मदत येर्इल व शेवटी तेच विजयी होतील. हे सर्व पाहिल्यानंतर असे जाणवते की, रमजानमध्ये मुस्लिम धर्मीयांची दिनचर्या म्हणजे जणू नैतिकतेचा महोत्सवच असतो.

(लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
इफ्तार ः ६.५५ (रविवारी सायंकाळी)
सहेरी ः ५.१४ (सोमवारी सकाळी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com