झोपडपट्टी पुनर्वसनच्या
अर्धवट कामाची तपासणी

झोपडपट्टी पुनर्वसनच्या अर्धवट कामाची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २६ : पुणे शहरात अर्धवट राहिलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची तपासणी करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दिले.
लोहियानगर येथील झोपडपट्टी धारकांचे बिबवेवाडी येथे तात्पुरती राहायची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी झोपडपट्टीधारकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रकल्पाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले आहे. नाना पेठेतील प्रकल्प पूर्ण झालेला असून तेथे लाभधारकांना मिळालेल्या घरांमध्ये कोणत्याही सोयी सुविधा नाही. ताडीवाला रोड येथील पानमळा प्रकल्पातील झोपडपट्टी धारकाला विकसक व अधिकाऱ्यांच्या असलेल्या संगनमतामुळे पात्र झोपडीधारकांना अद्याप हक्काचे घर मिळाले नाही, असे लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार सुनील कांबळे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, या सर्व तक्रारींची चौकशी करून अर्धवट राहिलेल्या कामांची पुन्हा एकदा तपासणी सरकारकडून करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

अशी आहे स्थिती
- शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
- काशेवाडी, मंगळवार पेठ, लोहिया नगर, ताडीवाला रोड, नाना पेठ इत्यादी ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे काम अर्धवट अवस्थेत आहेत.
- पुनर्वसन प्रकल्प करणाऱ्या विकसकांचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधामुळे प्रत्यक्ष झोपडपट्टी धारकांची विकासकाकडून वेगवेगळ्या प्रकारे अडवणूक होत आहे.
- पात्र असणाऱ्या झोपडपट्टीवासीयांनासुद्धा घरापासून वंचित राहावे लागत आहे.
- प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये या प्रकल्पांवर देखरेख व तांत्रिक तपासणी करण्यासाठी स्वतःचे मनुष्यबळ नाही.
- प्रकल्पाच्या बांधकामाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी होत नाही.
- त्यामुळे बांधकाम योग्य होते की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com