ड्रोनद्वारे फवारणीबाबत पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा

ड्रोनद्वारे फवारणीबाबत पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा

पुणे, ता. ४ ः मानवविरहित हवेतून उडणारे स्वयंचलित वाहन अर्थात ड्रोनबाबत सर्वत्र कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा फवारणीसाठी वापर वाढू लागला आहे. अशा या ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीत वापराविषयी मार्गदर्शन करणारी एक दिवसाची राज्यस्तरीय कार्यशाळा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि सकाळ-ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ११) पुण्यात सकाळनगर येथे आयोजिली आहे.
या कार्यशाळेचे उद्‍घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शेतीत ड्रोनचा वापर करायचा असेल तर त्यासाठी काही नियम व माहिती असणे आवश्यक आहेत. ड्रोन हवेतून उडणारे वाहन असल्यामुळे त्यासाठी काही परवानगी किंवा परवाने घ्यावे लागतात. या आणि अशा अनेक बाबींसंदर्भात कार्यशाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, शास्त्रज्ञ डॉ. सचिन नलावडे, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. शिरीषकुमार भणगे, डॉ. मुकुंद शिंदे, इंजिनिअर निळकंठ मोरे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेला प्रतिव्यक्ती १२०० रुपये शुल्क आहे. यात जेवण व डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.


कार्यशाळेतील विषय....
- ड्रोनची ओळख, प्रकार, शेतीत वापर
- फवारणीसाठी वापर, फायदे व नियम
- ड्रोनचे विविध घटक, कार्यप्रणाली
- ड्रोनने फवारणीसाठी मान्यताप्राप्त रासायनिक द्रावणे
- फवारणी ड्रोनच्या साहाय्याने कीटकनाशके, खते फवारणीसाठीची मानके
- फवारणी ड्रोनच्या विविध घटकांची ओळख व प्रात्यक्षिक
- फवारणी ड्रोनच्या प्रसारासाठी शासनाचे विविध उपक्रम

कार्यशाळेचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं. १, बाणेर रोड, पुणे
नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com