savitribai phule Pune University
savitribai phule Pune Universityesakal

SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारी घसरली

देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान कमालीचे घसरले आहे.

पुणे - देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान कमालीचे घसरले आहे. विद्यापीठ सर्वच शैक्षणिक संस्थाच्या क्रमवारीत ३५ व्या स्थानावर तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मागील वर्षी पुणे विद्यापीठ सर्वच संस्थांच्या गटात २५ व्या स्थानावर होते. २०२० मध्ये विद्यापीठ गटात नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे, असे असले तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ अजूनही प्रथम क्रमांकावर आहे.

कामगिरीच्या आधारे रँकिंग

नॅशनल इस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले. तर ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांनी सोमवारी सकाळी ही क्रमवारी जाहीर केली. देशातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते.

दृष्टिक्षेपात

- वर्ष - शैक्षणिक संस्थांचा सहभाग

- २०१६ - ३,५००

- २०२३ - ८,६८६

१५ पैकी शून्य गुण

विद्यापीठांच्या मुल्यांकनामध्ये शोधनिबंध, पेटंट, शोधनिबंधांचा दर्जा आदींसाठी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अर्थात आयपीआर हा विशेष रकाना आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यात १५ पैकी चक्क शून्य गुण मिळाले आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीतही विद्यापीठाला २० पैकी फक्त एक गुण मिळाला आहे. विद्यापीठाच्या घसरलेल्या रॅंकिंगमुळे एकंदरीत कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

savitribai phule Pune University
NIRF : एनआयआरएफमध्ये पहिल्या शंभरात ११ संस्था महाराष्ट्रातील

विद्यापीठाचे गुणपत्रक (विद्यापीठ गटात) (प्रत्येकी १०० पैकी)

- अध्ययन, अध्यापन आणि संसाधन - ६६.९९

- संशोधन आणि प्रोफेशनल कार्य- ३९.३०

- पदवीची व्यवहार्यता - ९४.६३

- सर्वसमावेशकता आणि लोकाभिमुखता - ५१.७८

- समाजातील प्रतिमा - ४१.०७

savitribai phule Pune University
Itians : आयटीयन्सच्या अडचणीत वाढ! पाठविण्यात आले मेमो

मागील पाच वर्षांचे प्रगतिपुस्तक (क्रमांक)

वर्ष - सर्वसाधारण गट - विद्यापीठ

२०१९ - १७ - १०

२०२० - १९ - ९

२०२१ - २० - ११

२०२२ - २५ - १२

२०२३ - ३५ - १९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com