मोकाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी जेरबंद

मोकाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी जेरबंद

पुणे, ता. ७ : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. गेल्या आठ महिन्यांपासून तो फरार होता. सूरज संतोष ढवळे (वय १९, रा. साईनगर, हिंगणे खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर यांच्या पथकातील सहायक निरीक्षक सचिन निकम, सहायक फौजदार आबा उतेकर पोलिस अंमलदार देवा चव्हाण यांनी आरोपीला चिपळूण (जि. रत्नागिरी) येथून अटक केली.

फुरसुंगीजवळ तरुणाचा मृत्यू
पुणे, ता. ७ : भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वडकी रस्ता परिसरात फुरसुंगी फाट्याजवळ शनिवारी दुपारी घडली. श्रीधर धर्मा कदम (वय ३३, रा. सिद्राममळा, लोणीगाव, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल मुंढे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मोटारचालक आदिल सिराज मुलाणी (वय २३, रा. दिवे, ता. पुरंदर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. दरम्यान, आरोपी हा मोटारीची मूळ नंबर प्लेट बदलून चुकीची नंबर प्लेट लावून मोटार फिरवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

नवजात अर्भक उघड्यावर फेकून दिले
पुणे, ता. ७ : लोहगाव रस्त्यावरील शिवरकर वस्तीत एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. मंगळवारी (ता. ६) हा प्रकार समोर आला. अज्ञात व्यक्तीने कपड्यात गुंडाळून दोन महिन्यांचे जिवंत अर्भक उघड्यावर फेकून दिले. याबाबत पोलिस अंमलदार शंकर क्षीरसागर यांनी फिर्याद दिली. त्यावरून लोणीकंद पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

किर्लोस्कर ऑइल कंपनीतून चंदनाच्या झाडाची चोरी
पुणे, ता. ७ : खडकी येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन लि. या कंपनीच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाच्या झाडाचे खोड चोरी केल्याचे समोर आले आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येऊन चंदनाच्या झाडाचे खोड कापून नेले. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कंपनीचे सहायक सुरक्षा अधिकारी रमेश चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यावरून खडकी पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com