इंटरनेट सेवा देणाऱ्याकडे मागितली खंडणी

इंटरनेट सेवा देणाऱ्याकडे मागितली खंडणी
Published on

पुणे, ता. २८ ः ‘तुम्हाला काम करायचे असेल, तर आम्हाला दर महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील,’ असे म्हणत इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्यांना दोघांना न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत मोका कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

अतुल अनिल धोत्रे (वय २१) आणि तेजस शिवाजी विटकर (वय २१, दोघेही रा. वडारवाडी) अशी मोका कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निखिल बाजीराव भोरडे यांनी फिर्यादी दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना मोका कोठडी देण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.

फिर्यादी यांचा इंटरनेट सेवा पुरविण्याचा व्यवसाय आहे. २१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान वडारवाडी येथील माणिकचंद टॉवर या व्यावसायिक इमारतीत फिर्यादी यांचे कामगार इंटरनेटचे वायर टाकण्याचे काम करीत होते. त्या वेळी आरोपी निखिल शिवा कांबळे व धोत्रे यांनी धमकी देत त्यांचे काम थांबविले. कांबळे, धोत्रे आणि विटकर यांनी फिर्यादी यांच्याकडे १० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती फिर्यादीकडून चार हजार रुपये शुल्क स्वीकारले, असे तक्रारीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com