वानवडीतून वाहन चोरट्यास अटक

वानवडीतून वाहन चोरट्यास अटक

पुणे, ता. ७ ः वानवडी परिसरातून वाहने चोरी करणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी अटक केली. वानवडी पोलिसांनी चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. सर्फराज ऊर्फ बॉबी मोमीन (वय २३, रा. कोंढवा) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस कर्मचारी अमजद पठाण, महेश गाढवे, नीलकंठ राठोड, संतोष काळे व विष्णू सुतार हे वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी एक तरुण त्याच्याकडील दुचाकी कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकास वानवडीमधील शिंदे छत्री परिसरातील मारुती मंदिराजवळ दुचाकीवरील एक तरुण संशयितरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या तरुणाकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता, त्याने ती दुचाकी महंमदवाडी परिसरातून चोरल्याचे कबूल केले. तसेच वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीसह विविध ठिकाणी दुचाकी चोरल्याची माहितीही त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीच्या एकूण तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com