Pune Crime: प्राध्यापक असल्याचे सांगून युवतीचा विनयभंग, विद्यापीठालगत बस थांब्याजवळ घडला प्रकार

Pune Crime: प्राध्यापक असल्याचे सांगून युवतीचा विनयभंग, विद्यापीठालगत बस थांब्याजवळ घडला प्रकार

प्राध्यापक असल्याचे सांगून युवतीचा विनयभंग
पुणे : विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगून युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालगत बस थांब्याजवळ घडली. या प्रकरणी एका २१ वर्षीय युवतीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून केतन कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार युवती पीएमपी बसमधून विद्यापीठाजवळ उतरली. ही युवती रात्री आठच्या सुमारास विद्यापीठातील वसतिगृहाकडे निघाली होती. त्यावेळी कुलकर्णीने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला अडवले. विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगत युवतीचा हात पकडला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com