श्रीमंत दगडूशेठ गणपतीला
२१ हजार सूर्यफुलांचा अभिषेक

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला २१ हजार सूर्यफुलांचा अभिषेक

पुणे, ता. ४ ः चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे व सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली. सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जय सिंग यांनी उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले आहे. सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com