कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत 
घेण्याच्या निर्णयाचे स्वागत

कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयाचे स्वागत

पुणे, ता. ८ ः महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना ४५ वयोमर्यादा व अन्य कारणांसाठी कामावरून कमी केल्यानंतर संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी निर्णय घेऊन २५० सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कंत्राटी कामगार मेळाव्यात महापालिका आयुक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले.

राष्ट्रीय मजदूर संघाच्यावतीने काँग्रेस भवन येथे महापालिका कंत्राटी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सरचिटणीस एस. के. पळसे उपस्थित होते. या मेळाव्यासाठी पाणीपुरवठा, सुरक्षा रक्षक, उद्यान, स्मशानभूमी विभाग, , कचरा वाहतूक करणारे चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘महापालिका कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी संघटनेवर विश्‍वास दाखविल्याने आपली संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे संघटनेने आंदोलन करून अन्याय झालेल्या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले. महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतकाच बोनस दिला पाहिजे, अशी मागणी केली होती. याबरोबरच कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहिले पाहिजे. किमान वेतन कायद्यातील फरकाशी रक्कम तात्काळ दिली गेली पाहिजे, अशा महत्त्वाच्या मागण्यांसाठी यापुढेही लढा देणार आहे.’’ या वेळी बाबा कांबळे, संदीप पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पांडव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com