महंमदवाडीतील पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा

महंमदवाडीतील पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा

पुणे, ता. १७ ः महंमदवाडी येथील बहुतांश भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास लहूजी शक्ती सेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महंमदवाडी येथील तरवडे वस्ती, राजीव गांधी कॉलनी, देसाई रुग्णालय, सर्वे क्रमांक ९४/१/१ या भागात राहणाऱ्या नागरिकांना कित्येक दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दिवसातून केवळ अर्धा तास पाणी पुरवठा होत आहे. हे नागरिक वेळेवर कर भरतात, पण त्यांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कर पाहिजे असेल तर सेवाही द्या, अशी मागणी लहूजी शक्ती सेनेने महापालिकेकडे केली आहे. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे शहर संघटक विनोद पवार, संकेत शिंदे, तिरुपती कसबे, विजय अडागळे, यमराज खरात यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com