नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी प्रशिक्षण

नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी प्रशिक्षण

पुणे, ता. १४ : ‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’तर्फे रिअल इस्टेट एजंट प्रमाणन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. यासाठी ‘महारेरा’कडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून ‘एसआयआयएलसी’ला मान्यता मिळाली आहे. २० तासांचे ऑनलाइन तसेच तीन दिवसांच्या ऑफलाईन प्रशिक्षणाद्वारे एजंटना ‘महारेरा’तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सक्षम केले जात आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रशिक्षणाची पुढील बॅच सोमवार (ता. २४) पासून आयोजिली आहे. ‘महारेरा’ने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा प्रशिक्षणात होतील.
नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी ‘महारेरा’ने प्रशिक्षण व प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. नोंदणीकृत एजंटामार्फतच मालमत्ता खरेदी करावी असे आवाहनही ‘महारेरा’ने ग्राहकांना केले आहे. तसेच नोंदणीकृत नसणाऱ्या एजंटना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच एप्रिल व मे महिन्यात महारेरातर्फे होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


प्रतिव्यक्ती शुल्क : पाच हजार अधिक जीएसटी.
ऑफलाईन प्रशिक्षणाचे ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०३, ९१३००७०१३२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com