राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

पुणे, ता. २६ : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढायला लागला आहे. सकाळपासून उन्हाचा कडाका, दुपारी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरींचा शिडकाव असे काहीसे वातावरण अनेक ठिकाणी आहे. पश्चिम विदर्भ ते दक्षिण कर्नाटकापर्यंत वाऱ्याची खंडितता कायम असून ती उत्तर कर्नाटकातून जात आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. जळगावमध्ये ३९.६ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले. तर महाबळेश्वर येथे १६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात घट होत असताना किमान तापमानात वाढ होत आहे. ढगाळ वातावरण आणि खंडित वाऱ्यांच्या प्रभावामुळे विदर्भात कमाल आणि किमान तापमानात तीन ते सात अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये कमाल आणि किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्याचे दिसून आले. पुणे आणि परिसरातही रविवारपर्यंत (ता. ३०) आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com