विकासकामांसाठी ‘पाऊल पढते पुढे’!

विकासकामांसाठी ‘पाऊल पढते पुढे’!

पुणे, ता. २७ ः पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीने तब्बल दोन हजार १०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विकासकामांना मंजुरी देत महापालिका प्रशासनाने विकास कामे गतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिकेचे सुमारे साडे नऊ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देणाऱ्या वित्तीय समितीच्या मंजुरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच महापालिकेच्या वित्तीय समितीने सुमारे दोन हजार १०० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली. वित्तीय समितीने मंजुरी दिल्यानंतर संबंधित कामाचे पुर्वगणन पत्रक तयार करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम प्रत्यक्षात सुरू होण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे विकासकामांच्या गतीवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन वित्तीय समितीने पहिल्याच महिन्यात विकासकामांना मंजुरी दिली.
महापिालका मेट्रोला सुमारे चारशे कोटी रुपयांचे देणे आहे. त्यापैकी सुमारे १९४ कोटी रुपये गेल्या दोन महिन्यांत मेट्रोला दिले गेले आहे. यामध्ये टिओडीचा वाटा म्हणून ४० कोटी रुपये देण्यात आले आहे. मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठते, त्या ठिकाणी मेट्रोने अद्याप उपाय योजना केल्या नाहीत. महापिालकाच आता या भागात काम करणार असून, या कामांचा खर्च हा मेट्रोला देणे असलेल्या रकमेतून कमी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोहगाव पाणी पुरवठा योजनेला मान्यता
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस-म्हाळुंगे या गावांसाठी तयार केलेल्या पाणी पुरवठा योजनेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानंतर आता वाघोली-लोहगाव या गावांसाठी २८३ कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिली आहे. त्याद्वारे ६० एमएलडी इतका पाणी पुरवठा होईल. या योजनेसाठी भामा आसखेड प्रकल्पातून महापालिकेस दरदिवशी २०० एमएलडी इतके पाणी मंजूर आहे. त्यापैकी सध्या १२० एमएलडी इतकेच पाणी महापिालका उचलत आहे. २०४१ या वर्षापर्यंत या भागातील वाढती लोकसंख्या गृहीत धरून वाघोली-लोहगाव पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार केला आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतरही महपालिकेच्या वाट्याचे २० एमएलडी इतके पाणी शिल्लक राहणार आहे.

महापालिकेच्या वित्तीय समितीने दोन हजार १०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये एक हजार २४० कोटी रुपयांची महसुली, तर ८९० कोटी रुपयांच्या भांडवली कामांचा समावेश आहे. वित्तीय समितीच्या मंजुरीमुळे पुढील प्रक्रिया वेगाने पार पडेल, त्यामुळे विकासकामे गतीने होण्यास मदत होईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापिालका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com