शाहू कॉलेजला आज चित्रकला स्पर्धा

शाहू कॉलेजला आज चित्रकला स्पर्धा

पुणे, ता. २८ : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (ता. २९) सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत तीन गटांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेसाठी पाचवी ते आठवी, नववी-दहावी आणि अकरावी-बारावी, असे गट असतील. स्पर्धकांना या स्पर्धेसाठी आवडता खेळ, शाळेची सहल, आवडता सण, उत्सव, भाजी मंडई, पुणे मेट्रो, पुण्यातील ऐतिहासिक स्थळे आदी विषय दिले आहेत. स्पर्धेत एकूण ५१ हजार रुपयांची बक्षीसे असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली असून स्पर्धेच्या दिवशीही नाव नोंदणी करण्यात येईल. ही स्पर्धा पर्वती परिसरातील शाहू कॉलेज येथे होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. नवनाथ क्षीरसागर व प्रा. मानसी केळकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड व प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कोळी यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com