व्यापाऱ्यांची फसवणूक करून पसार झालेला आरोपी अटकेत

व्यापाऱ्यांची फसवणूक करून पसार झालेला आरोपी अटकेत

पुणे, ता. ६ : भुसार मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता पसार झालेल्या आरोपीस स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपीने पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे.
हितेश नानकराम आसवानी (वय ३५, रा. दत्तनगर, नागपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेली वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी त्याचा साथीदार भूषण वसंत तन्ना (रा. लवकुश, नागपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या विरुद्ध पुण्यातील स्वारगेट, सांगलीतील तासगाव, नागपूरमधील लकडगंज, नंदनवन, तहसील पोलिस ठाण्यात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसवानी आणि तन्ना यांनी पिंपरीतील काळेवाडी परिसरात राधा एंटरप्रायझेस नावाने व्यवसाय सुरू केला होता. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर भुसार माल खरेदी केला होता. सुरवातीला आसवानी आणि तन्ना यांनी व्यापाऱ्यांचे पैसे दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांची पैसे थकवून दोघेजण पसार झाले.
आरोपी आसवानी पिंपळे गुरव परिसरात येणार असल्याची माहिती स्वारगेट पोलिस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आसवानीला पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com