‘रॉ’च्या तपासात धक्कादायक माहिती समोर येणार

‘रॉ’च्या तपासात धक्कादायक माहिती समोर येणार

पुणे, ता. ७ : देशातील संवेदनशील माहिती पुरविणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञाकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक संचाचे ‘रॉ’ गुप्तचर यंत्रणेने तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दिल्ली येथील ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत संशय आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्या ताब्यातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले होते. या चौकशीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या न्यायवैद्यक तपासणीत डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याचे समोर आले होते. त्यानंतर ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविले. मुंबई एटीएसने डॉ. कुरुलकर यांना अटक केली. न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांना येत्या मंगळवारपर्यंत (ता. ९) कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) गुप्तचर यंत्रणेनेही डॉ. कुरुलकर यांची चौकशी सुरू केली आहे.
डॉ. कुरुलकर हे सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांच्या संपर्कात होते. ते परदेशात पाकिस्तानी गुप्तचरांना भेटल्याचेही समोर आले आहे. ते पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, तसेच त्यांनी पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला (पीआयओ) कोणती माहिती दिली. तसेच ते देशात आणखी कोणाच्या संपर्कात होते, याबाबत तपास करण्यात येत आहे.

अतिपैसा आणि वासनेच्या मोहात अडकून सुखी जीवन धोक्यात घालणाऱ्यांना संत सांगतात की मानवाने आपल्या मर्यादा ओलांडू नयेत. अतिपैसा आणि वासनेच्या आहारी गेलेल्याचे अधःपतन होते. संत सांगतात, जे लोक पैशांचा जास्त मोह करतात, ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत. या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो. काही वेळा तर या मोहात अडकून आपण वाईट कामांना आरंभ करतो, त्याने आपले सुखी जीवन अडचणीत येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com