यार्ड रिमॉडेलिंगचे काम महिन्यात सुरू करा 
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांचे आदेश

यार्ड रिमॉडेलिंगचे काम महिन्यात सुरू करा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांचे आदेश

पुणे, ता. २ : पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचा कालावधी १०७ दिवसांचा निश्चित करण्यात आला असून, हे काम सुरू करण्यासाठी आता पावसाळा संपण्याची वाट न पाहता एका महिन्याच्या आत कामे सुरू करण्याच्या सूचना थेट रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुणे स्थानकांवर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी पावसाळ्यानंतर सुरुवात होईल असे सांगितले होते. मात्र शुक्रवारी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत हे काम एका महिन्याच्या आत सुरू करण्याचे सांगण्यात आले. शिवाय यासाठी कामाचा कालावधी पूर्वीपेक्षा कमी करण्यात आला आहे. पूर्वी हे काम सुमारे २८६ दिवस चालणार होते. मात्र पुणे विभागाच्या डीआरएम इंदुराणी दुबे यांनी कामाचा कालावधी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे हे काम १०७ दिवसांत केले जाणार आहे. यामुळे प्रवाशांची जास्त दिवस गैरसोय होणार नाही. पहिल्यांदा फलाट सहाच्या विस्तारीकरणाच्या कामास सुरुवात होत होणार आहे. त्यासाठी पुणे यार्डमध्ये असलेले ट्रीप शेड पाडण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
यार्ड रिमॉडेलिंगचा कालावधी कमी झाल्याने गाड्या रद्द होण्याचे प्रमाण कमी झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यार्ड रिमॉडेलिंग
१. २०१६-१७ मध्ये मिळाली मंजुरी
२. ५२ कोटींचा खर्च अपेक्षित
३. यंदाच्या अर्थसंकल्पात ३१ कोटींचा निधी मंजूर
४. १५ आठवडे चालणार काम

पुणे स्थानकावरील वाहतूक
- दररोज पुण्याहून प्रवास सुरू होणाऱ्या रेल्वे : ७२
- १८ डबे असलेल्या रेल्वे : ४२
- पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे : २५०
- दररोजची प्रवासी संख्या : १ लाख ५० हजार
- लोकलच्या फेऱ्या : ३०

रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाला एका महिन्याच्या आत सुरुवात करण्यास सांगितले आहे. तसेच १०७ दिवसांचे डीसीएन तयार करण्यात आले आहे.
- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com