आत्यहत्येचा प्रयत्न करणाऱ्याला वाचवले

आत्यहत्येचा प्रयत्न करणाऱ्याला वाचवले

पुणे, ता. १३ : कल्याणीनगर भागात नदीपात्रात उडी मारून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला वाचवले. उडी मारलेला तरुण जलपर्णीत अडकल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. त्याने एका झाडाचा आधार घेतला होता. त्यामुळे जवान त्वरित दोर बांधून नदीपात्रात उतरले. पोहोत तरुणाजवळ जात त्याला बचावासाठी रबराची ट्यूब देण्यात आली. त्याआधारे तरुणाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जवानांनी संवाद साधून त्याला धीर दिला. बचाव केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे असून येरवडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे, तांडेल राजाराम केदारी, संदीप रणदिवे, चंद्रकांत नवले, सूरज बडे, अक्षय कलशेट्टी, प्रताप फणसे, अमित सरोदे, प्रशांत नवगिरे, शरद नवगिरे, नीतेश डगळे, अजिंक्य खाडे यांनी त्वरीत मदत केल्याने तो बचावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com