मोबाईल टॉवर साहित्य चोरणारे गजाआड

मोबाईल टॉवर साहित्य चोरणारे गजाआड

पुणे, ता १३ : बंद मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून १३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. सहा जिल्ह्यातील दहा मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांत टॉवर कंपनीतील दोन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

रमेश मल्लाप्पा गरसंगी (वय ३३ रा. मळघन ता. बसवन बागेवाडी, कर्नाटक) प्रशांत वामन यादव (वय ३१ रा.वडकी, पुरंदर), सुहास श्रीराम लाड (वय ४० रा.मांजरी बु ) जावेद हमीदुल्ला खान (वय ३३ रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि सचिन गणपत कदम (वय ४१ रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जी. टी. एल. इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या रांजणगावातील पाचंगे वस्ती परिसरातून टॉवरच्या साहित्य चोरीची घटना २८ जानेवारी रोजी घडली होती. यात चोरट्यांनी १५ लाखांचे साहित्य चोरून नेले होते. गुन्‍ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता.

पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना कर्नाटकातून आणि पुणे परिसरातून ताब्यात घेतले. आरोपींकडून १३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी सातारा, रत्नागिरी, सांगली, पुणे, बीड, रायगड येथून जी. टी. एलच्या १० टॉवरच्या साहित्याची चोरी केल्याचे कबूल केले.

अधिकाऱ्यांच्या मदतीने चोरीचा कट
अटक केलेल्या टोळीत जी. टी.एल इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २००८ साली ही कंपनी बंद झाली. त्यामुळे बंद टॉवरचे साहित्य चोरण्याचा कट अधिकाऱ्यांनी रचला. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, गणेश जगदाळे, अभिजित सावंत, तुषार पंदारे, सचिन घाडगे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, चंद्रकांत जाधव, अजित भुजबळ, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, अक्षय सुपे आदींनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com