सवलतीमुळे एसटी मालामाल

सवलतीमुळे एसटी मालामाल

पुणे, ता. १३ ः राज्य परिवहन महामंडळाच्या ‘महिला सन्मान’ व ‘अमृत’ या योजनांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. कोरोनापूर्वी एसटी महामंडळाची जी स्थिती होती त्यापेक्षा आता चांगले दिवस आले आहे. सवलतीमुळे प्रवाशांच्या संख्येत पर्यायाने उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. दिवसाचे उत्पन्न २९ कोटी इतके झाले असून प्रवासी संख्या ५५ लाखांवर गेले आहे. कोरोनापूर्वी प्रवासी उत्पन्न २३ कोटी इतके होते.
राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत तर अमृत योजनेत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी पूर्णपणे मोफत केले आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी प्रशासनाला देत असल्याने एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी प्रत्येक विभागाच्या विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून कामाचे कौतुक केले आहे.

प्रवास : ५४ लाख ६८ हजार किलोमीटर
प्रवासी उत्पन्न ः २९ कोटी
प्रवासी संख्या : ५५ लाख
बसची संख्या : १४ हजार ६००
सवलतीतून मिळणारे उत्पन्न : ९ कोटी
(ही आकडेवारी दैनंदिन स्वरूपाची आहे)

प्रवाशांना दिलेल्या सवलतींमुळे प्रवाशांच्या संख्येत व उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. आता गर्दीचा हंगाम सुरू आहे. एका दिवसाचे उत्पन्न २९ कोटी रुपये इतका आहे. प्रवासी संख्या ५५ लाख इतकी झाली आहे.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com