पुण्यात कमाल तापमानात घट

पुण्यात कमाल तापमानात घट

पुणे, ता. १५ ः पुणे शहर आणि परिसरात कमाल तापमानात घट कायम आहे. शहरात सोमवारी ३६.५ अंश सेल्सिअस तकमाल तापमान होते. जिल्ह्यात ही तापमान ४० अंशांच्या खाली कायम होते.
पुढील आठवडाभर निरभ्र वातावरणाची शक्यता असल्याने उन्हाच्या झळा मात्र पुढे अशाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान पुणे व परिसरात ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या जवळपास कमाल तापमान राहू शकते. तापमनात चढ-उतार असली तरी उन्हाचा तीव्रता अद्याप जाणवत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.
राज्यात कमाल तापमानात चढ-उतार कायम असून त्यात विदर्भात मात्र पारा चाळीशीपार कायम आहेत. दरम्यान राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. तर मंगळवारी (ता. १६) कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सोमवारी (ता. १५) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद नागपूर येथे ४३.२ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर मराठवाड्यात काही ठिकाणी ४० अंशांच्या घरात तापमान कायम आहे. सध्या दक्षिण हरियानामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली असून बंगालच्या उपसागरातील ‘मोखा’ चक्रीवादळचे जमिनीवर येताच या वादळाची तीव्रता ही ओसरली आहे. दरम्यान राज्यात मात्र उन्हाचा ताप आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com