चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

१) काष्ठशिल्प प्रदर्शन ः
बारामती येथील काष्ठशिल्पकार राहुल लोंढे यांच्या काष्ठशिल्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. लोंढे यांनी आजवर निर्मिलेल्या २५० कलाकृतींपैकी निवडक कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतील. यामध्ये एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी महासंचालक मुकेश शर्मा यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे.
कधी ः गुरुवार (ता. १८) ते शनिवार (ता. २०)
केव्हा ः सकाळी ९ ते सायंकाळी ८
कुठे ः बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता

२) ‘कानडा के प्रकार’ ः
प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे ‘कानडा के प्रकार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आजकाल कानडाचे विविध प्रकार रात्रीच्या मैफिली दुर्मिळ झाल्यामुळे फार ऐकायला मिळत नाहीत. हेच लक्षात घेत या कार्यक्रमात कानडाचे विविध प्रकार ऐकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गायिका विदुषी सानिया पाटणकर आणि त्यांचे सादरीकरण करणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. १९)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ

३) ‘बैठक’ ः
अल्फा इव्हेंट्सतर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित ‌‘बैठक’ सांगीतिक मालिकेअंतर्गत वर्षभरात सहा उपक्रम घेतले जाणार आहेत. या मालिकेतील पहिले पुष्प ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अमरेंद्र धनेश्वर आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या युवा गायिका डॉ. राधिका जोशी गुंफणार आहेत. त्यांना व्हायोलिनवर प्रज्ञा देसाई, संवादिनीवर लीलाधर चक्रदेव आणि तबल्यावर प्रणव गुरव साथसंगत करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. २०)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः द बेस, एसएनडीटी समोर, एरंडवणे

४) ‘दीपक - अ सोर्स ऑफ लाईट’ ः
नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर आणि कथकनाद संस्थेतर्फे ‘दीपक-अ सोर्स ऑफ लाईट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायनाने होईल. त्यानंतर शुभम उगळे यांचे पखवाज वादन होईल. कार्यक्रमाचा समारोप प्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या शिष्यांच्या कथक नृत्य सादरीकरणाने होईल.
कधी ः रविवार (ता. २१)
केव्हा ः सकाळी १० ते दुपारी १
कुठे ः एमईएस बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com