केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा लांबणार

केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा लांबणार

पुणे, ता. १७ ः केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीयुईटी) २१ ते २८ मे यादरम्यान घेतली जाणार आहे. मात्र काही शहरांमध्ये परीक्षार्थींची संख्या वाढल्यामुळे आता ही परीक्षा एक ते सहा जूनदरम्यानही पार पडेल, असे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) स्पष्ट केले आहे.
सीयुईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे, याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे काही शहरांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याने परीक्षेचा कालावधीही वाढविला आहे. ‘एनटीए’कडून देशभरात काही ठराविक शहरांमध्येच परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस आधीच विद्यार्थ्यांना संबंधित शहरात परीक्षेसाठी वेळेवर पोहचता यावे, या उद्देशाने एनटीएकडून सिटी इंटीमेशन स्लीप प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये परीक्षेची तारीख, परीक्षेची वेळ, विषय आणि शहराचा उल्लेख असतो. विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शहरांची निवड केल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांची नाराजी...
विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या पर्यायांमधून शहर मिळालेले नसल्याची तक्रार ट्वीटरवरून केली आहे. काही विद्यार्थ्यांना ९०० किलोमीटर लांबचे शहर दिले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोचताना विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे. आर्थिक भुर्दंडासाठी बराच वेळ प्रवासात घालवावा लागणार असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com