ऑटोमोटिव्ह मटेरिअल्स परिषदेचे आयोजन

ऑटोमोटिव्ह मटेरिअल्स परिषदेचे आयोजन

पुणे, ता. १९ : वाहन क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देत या क्षेत्राला आणखी गती देण्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) वतीने चाकण येथील होमोलोगेशन टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये (एआरएआय-एचटीसी) ‘ऑटोमोटिव्ह मटेरिअल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ मे दोन जून दरम्यान ही परिषद पार पडेल.
एसएई इंडिया आणि एएसएम इंटरनॅशनल, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एआरएआयच संचालक डॉ. रेजी मथाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे, वरिष्ठ उपसंचालिका आणि परिषदेच्या समन्वयक मेधा जांभळे यावेळी उपस्थित होत्या. काळाची गरज असलेल्या आत्मनिर्भरतेच्या अर्थात स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकत असताना मटेरिअल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हे दोन्ही घटक वाहन व्यवसायासातही महत्त्वाचे आहेत. हेच लक्षात घेत ‘एआरएआय’च्या माध्यमातून आम्ही मटेरिअल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती डॉ. मथाई यांनी दिली. परिषदेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समूह अध्यक्ष डॉ. अजित सप्रे, इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ ए. ए. इलानगोवन, डीआरडीओचे डॉ. बी. प्रवीणकुमार, टाटा मोटर्सचे श्रीपादराज पोंक्षे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रो. अलंकार आदी उपस्थित असणार आहेत.

याबाबत होणार चर्चा
अॅडव्हान्स मटेरिअल, प्लॅस्टिक व कंपोझिट, उत्पादन प्रक्रिया, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ई-मोबिलिटी, डिझाईन व सिम्युलेशन, एआय व एमएल.

असे आहे नियोजन
- शैक्षणिक क्षेत्रामधील २० हून अधिक तज्ज्ञांची बीजभाषणे,
- मटेरिअल्स आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित १५ तांत्रिक सत्रांत ४० हून अधिक तांत्रिक पेपर्स
- मटेरिअल्स फॉर सस्टेनेबल मोबिलिटी विषयावर चर्चासत्र
- वाहन उद्योग, तंत्रज्ञान आणि विकास यांच्याशी संबंधित २५ स्टॉल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com