नगर महामार्ग होणार वाहतूक कोंडी मुक्त

नगर महामार्ग होणार वाहतूक कोंडी मुक्त

पुणे, ता. १९ : पुणे-अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यास अहमदनगर व मराठवाडा तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या रस्त्याची क्षमता ४० हजार वाहने (पीसीयू) इतकी असताना प्रत्यक्षात ७५ हजार वाहने दररोज धावतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणे वाढले असून, वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गावरील कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरूर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना आदेश दिले होते. त्यानंतर संयुक्त पाहणीनंतर केल्यानंतर सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलिस, परिवहन विभाग, महावितरण, पीएमपी, पीएमआरडीए, एमआयडीसी, संबंधित ग्रामपंचायतींना दिले.

या आहेत उपाययोजना
- वाघेश्वर पार्किंग येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल बसविणे, वाघेश्वर मंदिर ते वाहनतळ चौक दरम्यान रस्ते दुभाजकांना रंग लावणे,
-रिफ्लेक्‍टर, रेलिंग बसवणे, रस्त्यांवर पट्‌टे मारणे
- पदपथापरील अतिक्रमणे हटवणे, अनधिकृत फेरीवाले, टपरीवाले, फळविक्रेत्यांना मज्जाव करणे
- वाघोली चौकात प्रवासी बसना रस्त्यावर थांबण्यास बंदी
- वाहतूक सिग्नल्स बसविणे, दिशादर्शक फलक व नो पार्किंग सूचनाफलक बसवणे
- प्रमुख गावातून जाणाऱ्या रस्त्यांवरील दुभाजकांवर रेलिंग बसविणे

नागरिकांनो, सूचना पाठवा
हा महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले, असून नागरिकांनी त्या rto.१२-mh@gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
...................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com