रेल्वे कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी अहिरे

रेल्वे कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी अहिरे

पुणे, ता. १९ ः स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनच्या मध्य रेल्वेच्या अध्यक्षपदी दीपक अहिरे यांची, तर महासचिवपदी पुण्याचे संतोष कडाळे यांची निवड करण्यात आली. पुण्यात नुकतीच युनियनची वार्षिक बैठक झाली. या वेळी नवी कार्यकारिणीदेखील निवडण्यात आली. पुण्यातील रेल्वे इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत विविध ठराव झाले. महासचिव संतोष कडाळे म्हणाले, ‘‘मध्य रेल्वेत सुमारे १९ हजार, तर पुणे विभागात १७०३ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कार्य पद्धतीवर होत आहे. रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे आहे.’’ या वेळी ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचे मध्य रेल्वेचे महासचिव पी. व्ही माळी यांच्यासह किशोर पाटील, डिझेल शेड ब्रँच अध्यक्ष अरुण कांबळे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष महेश चंद्रा, महासचिव विकास गौर आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संतोष कडाळे यांनी केले.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : नीलेश मोहिते-झोनल कोषाध्यक्ष (पुणे), जगजीवनराम-झोनल उपाध्यक्ष (मुंबई), राघो दहगावकर-अतिरिक्त सचिव (नागपूर), भारत बनसोडे -अतिरिक्त सचिव (सोलापूर), रितेश अंबुरे-झोनल कार्यकारिणी सदस्य (मुंबई).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com