‘वीरभूमी परिक्रमा सप्ताहा’चे आयोजन

‘वीरभूमी परिक्रमा सप्ताहा’चे आयोजन

‘वीरभूमी परिक्रमा सप्ताहा’चे आयोजन
पुणे, ता. १९ ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि विवेक व्यासपीठातर्फे शहरात २१ ते २८ मे या कालावधीत ‌‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाअंतर्गत विविध माध्यमातून सावरकर विचारांचा जागर करण्यात येणार आहे. यामध्ये ‌‘शिवराय ते सावरकर’ नाट्यप्रयोग, ‌‘मी... येसूवहिनी’ या नाटकाचे अभिवाचन, सावरकर यांच्या गीतांचे ‌‘द डायनामाईट- रॉक बँड’ सादरीकरण, सावरकर यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणारा ‌‘स्वतंत्रते भगवती’ आणि ‌‘यशोयुताम वंदे’ हा नृत्याविष्कार, सावरकर यांच्या प्रेरणादायी साहित्याचा मागोवा घेणारा ‌‘लेखणी सावरकरांची’, ‌‘तेजोनिधी सावरकर’, ‌‘अनादी मी! अनंत मी!’ या अजरामर नाटकाचा प्रयोग आदींचा समावेश आहे.

‘अमर-लता मंगेशकर’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, ता. १९ ः शंकर जयकिशन फाउंडेशन, अहमदाबाद आणि श्रीविद्या एंटरप्रायझेस, पुणे यांच्यातर्फे लता मंगेशकर आणि शंकर जयकिशन यांच्या अजरामर गीतांच्या ‘अमर - लता मंगशेकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंकर जयकिशन संगीत महोत्सवांतर्गत आयोजित या दृकश्राव्य कार्यक्रमात रसिकांनी लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे लेखन व निवेदन श्रीधर कुलकर्णी यांनी केले. शंतनू आढाव यांनी गीतांचे संकलन केले.

नवकार आर्ट फाउंडेशनतर्फे प्रदर्शन
पुणे, ता. १९ ः नवकार आर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित देशभरातील ५० चित्रकारांच्या निवडक चित्रांचा समावेश असलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या हस्ते नुकतेच झाले. उद्‍घाटन सोहळ्याला ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, चित्रकार सुरेश लोणकर, प्रसाद देवोरे, यश काळवणकर, शंकर गोजारे, सुनिल हंबीर, ममता बोरा आदी उपस्थित होते. मंगळवारपर्यंत (ता. २३) सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. फाउंडेशनचे संस्थापक मनसुख छाजेड, प्रेरणा ओस्तवाल, संजय संचेती यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com