चिंचणीमध्ये उभे राहणार
आत्मभान कलादालन

चिंचणीमध्ये उभे राहणार आत्मभान कलादालन

पुणे, ता. २० : तमाशा आणि वारी, या महाराष्ट्राचे आत्मभान जागृत करणाऱ्या दोन ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन, संवर्धन, अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी ‘आत्मभान कलादालन’ साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पंढरीच्या वाटेवर, पंढरपूरच्या अलीकडे १६ किलोमीटरवर असलेल्या चिंचणी या गावी हे आगळेवेगळे कलादालन येत्या तीन वर्षांत उभे करण्यात येणार आहे.

आत्मभान ट्रस्टचे पदाधिकारी आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी शनिवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रसंगी ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्यासह निशा साळगावकर, नीलिमा कढे आणि केशव कासार हे ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. या भव्य लोकप्रकल्पाच्या उभारणीसाठी भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली आत्मभान विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

‘‘सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणातील विस्थापितांचे गाव असलेल्या चिंचणी येथील ग्रामस्थांनी या कलादालनासाठी सार्वजनिक मालकीची जमीन विनामोबदला दिली आहे. दुमजली इमारत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च सुमारे तीन कोटी रुपये आहे. हा निधी सामान्यांकडून उभा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे तमाशा आणि वारी या दोन महाराष्ट्राच्या लोकपरंपरांच्या जतन आणि संवर्धनाविषयी लोकांच्या कल्पना आणि सूचनांचा स्वीकार केला जाईल,’’ असे भंडारे यांनी सांगितले.

‘‘ग्रामीण भागात महत्त्वाची सांस्कृतिक केंद्रे असल्याची उदाहरणे अपवादात्मक आहेत. खेड्याकडे दुर्लक्ष करून संस्कृतीचे जतन होऊ शकते का, याचे उत्तर आत्मभान ट्रस्टने दिले आहे. सांस्कृतिक वातावरणाची धूळधाण होत असताना या कलादालनाच्या माध्यमातून संस्कृतीचे बीज रोवले जात आहे,’’ असे डॉ. देवी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com