एकाच क्रमांकाच्या दोन रिक्षांचा
आरटीओकडून शोध सुरू

एकाच क्रमांकाच्या दोन रिक्षांचा आरटीओकडून शोध सुरू

पुणे, ता. २४ ः पुण्यात एकच क्रमांकाच्या व सिरीजच्या रिक्षातून प्रवाशांची बेकायदेशीररीत्या वाहतूक सुरू आहे. या रिक्षांवर कारवाई करण्यासाठी पुणे आरटीओ कार्यालयाने वायुवेग स्थापन केले असून त्यांना बेकायदेशीर रिक्षा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे.

रिक्षाचालक राजेंद्र चंद्रकांत बोराटे (रा. पिंपळे खुर्द मधली आळी, नीरा, ता. पुरंदर) यांची (एमएच १२ ए. क्यु१०८०) या क्रमांकाची रिक्षा आहे. रविवारी (ता.२१) मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास बोराटे यांना आपल्या मोबाईलवर रिक्षाला दंड झाल्याचा संदेश आला. ऑनलाइन पद्धतीने इ-चलनची माहिती घेतली असता त्यांना खडकी पोलिस स्टेशनच्या परिसरात एक व्यक्ती त्याच क्रमांकाच्या रिक्षा चालविताना फोटो दिसला. तर रिक्षा चालकाकडे वाहन परवाना नसल्याने वाहतूक विभागाच्या पोलिसांनी एक हजार रुपयांचा दंड आकारला. या प्रकरणी तपास केल्यावर एकाच क्रमांक व सिरीजच्या दोन रिक्षा आढळून आल्या. दुसऱ्या व्यक्तीने बेकायदेशीररीत्या राजेंद्र बोराटे यांच्या रिक्षाचा क्रमांक स्वतःच्या रिक्षाला दिल्याने त्या रिक्षाचा दंडाचा संदेश राजेंद्र बोराटे यांना बसल्याने हे बिंग फुटले.

माझ्या रिक्षाचा क्रमांक टाकून बनावट व बोगस रिक्षा रस्त्यावर धावत आहे. ही रिक्षा बेकायदेशीररीत्या फिरत असून वाहतूक पोलिसांनी व आरटीओ प्रशासनाने संबंधित रिक्षा चालकांवर कारवाई करावी.
- राजेंद्र बोराटे, रिक्षा चालक

रिक्षांवर बनावट क्रमांक टाकून बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीची घटना या पूर्वी देखील घडली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ती रिक्षा भंगारातील असून ती स्क्रॅपमध्ये निघणे अपेक्षित असताना ती रस्त्यावर धावतेच कशी. आरटीओ प्रशासनाने कारवाई करावी.
- शफीक पटेल, अध्यक्ष, आझाद रिक्षा चालक संघटना

संबंधित रिक्षाचा शोध घेण्यासाठी वायुवेग पथकाला आदेश देण्यात आले. आरटीओचे निरीक्षक त्या रिक्षाचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com