Bus Bay
Bus BaySakal

Bus Bay : प्रवाशांना दिलासा! शिवाजीनगर येथे बस बे, शंभरहून अधिक बस धावणार

शिवाजीनगरच्या मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना दक्षिण व पूर्व पुण्याला जाणे सोपे होणार.

पुणे - शिवाजीनगरच्या मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना दक्षिण व पूर्व पुण्याला जाणे सोपे होणार आहे. मेट्रो प्रशासन ‘पीएमपी’साठी बस बे सुरु करीत असून तिथून ‘पीएमपी’च्या सुमारे शंभरहून अधिक बस धावतील.

येथून फिडर सेवा तर असेलच शिवाय ‘पीएमपी’च्या मोठ्या बसेस देखील शिवाजीनगर कोर्टरूमपासूनच धावतील. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पीएमपी प्रशासन त्या दृष्टीने नियोजन सुरु केले असून मेट्रोची सेवा सुरु झाल्यावरच ‘पीएमपी’च्या बस सेवेला सुरवात होईल.

मेट्रोच्या मार्गिकाचा विस्तार आता रूबी हॉलपर्यंत झाला आहे. लवकरच रूबी हॉलपर्यंत प्रवासी सेवा देखील सुरू होईल. मेट्रोतून उतरल्यानंतर अथवा मेट्रोचा प्रवास सुरु करण्यासाठी ‘पीएमपी’ची बससेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

अशी आहे तयारी

- ‘पीएमपी’ प्रशासनाने गरवारे महाविद्यालय येथून फिडर सेवा सुरु करण्याचे निश्चित केले आहे.

- त्यासाठी सात मीटरच्या बसची आवश्यकता आहे.

- ‘शिवाजीनगर कोर्ट रूम’च्या बस बेपासून प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी मात्र ती आवश्यकता नाही.

- नऊ व १२ मीटरच्या बसमधून देखील प्रवासी सेवा सुरु होऊ शकते.

- शिवाजीनगर बस बेसाठी १२ मीटर लांबीच्या वातानुकूलित बसचा वापर करणार आहे.

कोंडी दूर होण्यास मदत

सध्या ‘पीएमपी’च्या काही मार्गांचे संचलन शनिवार वाडा जवळच्या सूर्य हॉस्पिटल येथून सुरु आहे. ‘शिवाजीनगर’चा बस बे सुरु झाल्यावर सूर्य हॉस्पिटलचे संचालन बस बे येथून होणार आहे. त्यामुळे त्या भागातील वाहतूक कोंडी देखील दूर होण्यास मदत होईल. येत्या एक ते दीड महिन्यात हा बदल होण्याची शक्यता आहे.

दहाहून अधिक मार्गावर बस

- शिवाजीनगर बस बेवरून किमान १० मार्गांवरच्या बस सुटतील.

- यासाठी किमान २५ बसचा वापर होईल.

- दिवसभरात १०० हून बसच्या फेऱ्या होतील असे नियोजन.

- यातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होईल.

- ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्याची संख्या वाढेल असा ‘पीएमपी’चा अंदाज आहे.

- त्यामुळे प्रवासी उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर कोर्ट रूम येथे ‘बस बे’ची सुविधा उपलब्ध होत आहे. तिथून आम्ही प्रवासी सेवा सुरु करणार आहोत. येथे चार्जिंग स्टेशनची देखील आम्ही मेट्रो प्रशासनाकडे मागणी केली आहे. ‘बस बे’मुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com