पुणे जिल्ह्यातील सात पर्यटक हिमाचलमध्ये अडकले

पुणे जिल्ह्यातील सात पर्यटक हिमाचलमध्ये अडकले

Published on

पुणे, ता. ११ : हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेलेल्या पुणे जिल्ह्यातील १७ जणांचा संपर्क गेल्या दोन दिवसांपासून होत नसल्याने या व्यक्तींच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला होता. दरम्यान, मंगळवारी १७ पैकी १० जणांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. तर, उर्वरित सात पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला देण्यात आली आहे.
सद्या उत्तरेकडील राज्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या राज्यांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी जातात. ४ ते ९ जुलै दरम्यान चंदीगढ ते हिमालच प्रदेशातील मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या १७ जणांचा संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. त्यातील १० व्यक्तींशी मंगळवारपर्यंत संपर्क झाला असून ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाला दिली. उर्वरित सात व्यक्तींची माहिती राज्य शासनाला दिली आहे. राज्य शासन हिमाचल प्रदेशातील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून त्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.