MSEDCL : ग्राहकांकडून महावितरणला ‘शॉक’!

पुणे परिमंडलात २०४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी
MSEDCL
MSEDCLesakal

पुणे : पुणे परिमंडळातील सर्व प्रकाराच्या सात लाख आठ हजार ८९२ वीजग्राहकांकडे २०४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरु करण्यात आली आहे.

त्यानुसार गेल्या पंधरवड्यात पुणे परिमंडलातील १४ हजार १५५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे,

MSEDCL
Pune Crime: पैसे परत न केल्यानं सावकाराने पतीपुढेच पत्नीवर केला बलात्कार, पुण्यातील खळबळजनक घटना

यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता . ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MSEDCL
Pune Rain Update : पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर शहरात मध्यम पाऊस

पुण्यातील स्थिती
- एकूण तीन लाख १४ हजार ९२० वीजग्राहकांकडे ७६ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी
- त्यामध्ये घरगुती दोन लाख ६८ हजार १२२ ग्राहकांकडे ५३ कोटी ९१ लाख रुपये
- वाणिज्यक ४३ हजार ६३८ ग्राहकांकडे २० कोटी नऊ लाख रुपये थकीत
- औद्योगिक तीन हजार १६० ग्राहकांकडे दोन कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी
- आठ हजार ९१४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

MSEDCL
Pune Potholes : पावणे सतरा हजार खड्डे बुजविल्याचा पुणे महापालिकेचा दावा

पिंपरी चिंचवडमधील स्थिती
- पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ५१ हजार ४०९ वीजग्राहकांकडे ५४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी
- यामध्ये घरगुती एक लाख २५ हजार ८६९ ग्राहकांकडे ३१ कोटी ६३ लाख रुपये
- वाणिज्यक २१ हजार ३५ ग्राहकांकडे १३ कोटी ४ लाख रुपये थकीत
- औद्योगिक चार हजार ५०५ ग्राहकांकडे नऊ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी
- ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

MSEDCL
Pune News : पोलिस भरती परीक्षेत कॅापी, तिघांवरच गुन्हा दाखल

ग्रामीण भागात ७४ कोटी थकीत
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण दोन लाख ४२ हजार ५६३ वीजग्राहकांकडे ७४ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख १६ हजार २६१ ग्राहकांकडे ५२ कोटी ५७ लाख रुपये, वाणिज्यक २२ हजार ५९६ ग्राहकांकडे १४ कोटी ३५ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ७०६ ग्राहकांकडे सात कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर चार हजार २८९ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com