मायलॅब करणार डेंगीचे अचूक, जलद निदान

मायलॅब करणार डेंगीचे
अचूक, जलद निदान

पुणे, ता. २३ ः डेंगीच्या अचूक निदानासाठी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने दोन अत्याधुनिक चाचण्या नव्याने विकसित केल्या आहेत. त्यातून डेंगीचे जलद निदान करणे आता शक्य होणार आहे. ‘डेंगी रॅपिड गोल्ड टेस्ट'' आणि ‘डेंगी उच्च अचूकता ड्राय ल्युमिनेसेन्स अॅसे टेस्ट’ अशा या दोन चाचण्या आहेत, अशी माहिती मायलॅबतर्फे देण्यात आली.
डेंगीचे संशयित निदान आणि त्याचे निश्चित निदान यातून होणार आहे. कोणतीही जटिल प्रक्रिया न करता फक्त १५ ते २० मिनिटांमध्ये डेंगीचे निदान या चाचण्यांमुळे करणे शक्य झाले आहे. या चाचण्यांबद्दल ‘मायलॅब''चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, ‘‘रोगाचे लवकर निदानासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशात वाढणाऱ्या डेंगीचे वेळीच अचूक निदान करण्यासाठी या अद्ययावत चाचणी उपयुक्त ठरेल. या ‘जलद पॉइंट-ऑफ-केअर’ चाचण्या आरोग्यसेवा व्यावसायिकांना वेळेवर निदान करण्यासाठी अचूक आणि कार्यक्षम साधन ठरेल, असा विश्वास आहे. त्यातून रुग्णावर तातडीने उपचार करण्यास निश्चित मदत होईल.’’
डेंगीच्या ‘आयजीजी‘ ऍन्टीबॉडीज प्राथमिक संसर्गादरम्यान तापाच्या सातव्या दिवसाच्या आसपास दिसतात आणि दीर्घ कालावधीसाठी राहतात. या प्रगत चाचण्या सुरू केल्यामुळे डेंगीच्या वाढत्या उद्रेकाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरांकडे अत्याधुनिक निदानाचे साधन उपलब्ध झाले आहे. या महिन्याच्या अखेरीस चाचणी कीट उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com