Pune News : ‘PMRDA’ क्षेत्रातील PMPML बसचा प्रवास आता सवलतीत
Pune News : ‘PMRDA’ क्षेत्रातील PMPML बसचा प्रवास आता सवलतीतsakal

Pune News : ‘PMRDA’ क्षेत्रातील PMPML बसचा प्रवास आता सवलतीत

पीएमपीच्या प्रवाशांना आता ‘पीएमआरडीए’ क्षेत्रातला प्रवास ‘पास’वर करता येणार

पुणे : पीएमपीच्या प्रवाशांना आता ‘पीएमआरडीए’ क्षेत्रातला प्रवास ‘पास’वर करता येणार आहे. ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘पीएमआरडीए’चा प्रवास सवलतीत होणार आहे. हा पास दैनिक व मासिक स्वरूपाचा असेल.

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी (ता. ३१) पार पडली. या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह,

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आदी उपस्थित होते. या पासचे दर लवकरच ठरविण्यात येणार असून पीएमपीकडून पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांकरिता पास केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहेत.

बस स्क्रॅप करण्याची मर्यादा वाढवली
पीएमपी प्रशासन पूर्वी ताफ्यातील बसची वाहतूक सात लाख किलोमीटर झाल्यावर अथवा १० वर्षाचे आयुर्मान झाल्यावर बस स्क्रॅप करीत होते. त्या कालावधीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता ८. ४० लाख किलोमीटरची वाहतूक झाल्यावर अथवा १२ वर्ष आयुर्मान झाल्यावर बस स्क्रॅप केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com