‘खुलूसद्वारे वेश्यांच्या वेदनांची मांडणी’

‘खुलूसद्वारे वेश्यांच्या वेदनांची मांडणी’

पुणे, ता. २७ ः ‘खुलूस’ या पुस्तकाद्वारे मी वेश्या व्यवसायाचे उदात्तीकरण केलेले नाही, तर त्यांच्या वेदानांना वाट करून दिली आहे. माणूस म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहता आले पाहिजे,’’ असे मत ‘रेड लाइट डायरीज : खुलूस’ या पुस्तकाचे लेखक समीर गायकवाड यांनी व्यक्त केले.

अक्षरधारा वाचक कट्टा आणि रोहन प्रकाशनातर्फे ‘खुलूस’ या पुस्तकाच्या निमित्ताने गायकवाड यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. लेखिका-संपादिका स्नेहा अवसरीकर आणि रोहन प्रकाशनाचे संचालक प्रदीप चंपानेरकर यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर आणि रोहन प्रकाशनाचे संचालक रोहन चंपानेरकर उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, ‘‘रेड लाइट एरियातील किती स्त्रिया स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात येतात, याच्याशी आपल्याला देणेघेणे नसते. पण त्यांच्याविषयी आपल्या समाजाने काही ठाम गैरसमज करून घेतले आहेत. या स्त्रियांविषयी उघडपणाने बोलणे टाळून आपण त्यांना समाज नावाच्या रिंगणाबाहेर ठेवतो. या प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी त्यांच्या वेदनेचा धागा मात्र समान आहे. माणूस म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहता आले नाही, तर त्या समाजाचा घटक म्हणून कधीच सन्मानाने जगू शकणार नाहीत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com