कोंढणपूरमधील शिबिरात चष्म्यांचे वाटप

कोंढणपूरमधील शिबिरात चष्म्यांचे वाटप

पुणे, ता. ३० : कस्तुर हिरालाल किराड ट्रस्टतर्फे कोंढणपूर गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. या वेळी पुण्यातील ताराचंद हॉस्पिटल व कम्युनिटी आयकेअरच्या सहकार्याने २९४ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली व २२३ गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले.

किराड ट्रस्टतर्फे ४१ वर्षांपासून शहरातील विविध भागांमध्ये आरोग्य शिबिर होते. ट्रस्टतर्फे अनेक संस्थांमध्ये आरोग्यविषयक व्याख्यान देऊन जनजागृती केली जाते. ज्या गावांमध्ये दवाखाना नाही, डॉक्टर नाही अशा गावांतील नागरिकांची तपासणी होणे अत्यंत गरजेचे असते, त्यासाठी ग्रामीण भागात शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये पुणे जिल्हा परिषदेमार्फत २०४ नागरिकांच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली गेली. यामध्ये शुगर, बीपी, इसीजी अशा अनेक तपासण्या करून औषधे देण्यात आली. डॉ. सत्यशील नाईक, किराड समाजाचे अध्यक्ष सोमनाथ किराड, माजी नगरसेवक गोपाल चिंतल आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com