विद्वान माणसाच्या लेखणीतील
शार्इचा थेंब सर्वाधिक पवित्र

विद्वान माणसाच्या लेखणीतील शार्इचा थेंब सर्वाधिक पवित्र

हजरत पैगंबर यांनी आपल्या अवतार कार्यात शिक्षणास अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्ञानाची महती केवढी मोठी आहे, याचे विवेचन हजरत पैगंबरांनी फारच सुंदर केले आहे. ते म्हणतात, ‘‘ज्ञान संपादन करा, कारण नीती व अनीती, न्याय व अन्याय, पाप व पुण्य यामधील फरक फक्त ज्ञानामुळेच कळतो. ज्ञानदीप स्वर्गाला जाणारा रस्ता दाखवतो. वाळूच्या भयाण मैदानात, ज्ञान हा आपला ‘सखा’, एकांतात समाज, निराश्रित अवस्थेत आधार आहे. ज्ञान सौख्याचा मार्गदर्शक, दुःखाचा वाटेकरी, मित्रामधील भूषण आणि शत्रूपासून संरक्षण करणारे, ते मजबूत चिलखत होय! फक्त पुरुषांनी शिक्षण न घेता, स्त्रियांनीही शिक्षण अवश्य घेतले पाहिजे, असा हजरत पैगंबरांनी उपदेश केला आहे. शिक्षण घेणे हे स्त्री-पुरुषांचे आद्य कर्तव्यकर्म आहे, अशी त्यांनी शिकवण दिली. आणि म्हणूनच पवित्र कुराणमध्ये ‘पढो (इक्रा)! पढो (इक्रा)!!’ या अरबी शब्दाचा पुन्हा पुन्हा उल्लेख आला आहे. हजरत पैगंबरानंतर खलिफांनी साऱ्या जगभर शिक्षणाचा प्रसार केला, त्याचे सर्व श्रेय हजरत पैगंबर यांनाच दिले पाहिजे. प्रा. शेषराव मोरे यांनी खलिफांचे हे कार्य ‘इस्लामचा सुवर्णकाळ’ या त्यांच्या पुस्तकात अतिशय विस्तृतपणे मांडले आहे.
विद्वान माणसाचा गौरव करताना हजरत पैगंबर म्हणतात, ‘‘हुतात्म्याच्या रक्तापेक्षा विद्वान माणसाच्या लेखणीतील शार्इचा एक थेंब अधिक पवित्र आहे.’’ हजरत पैगंबरांनी विद्वान माणसांचा गौरव किती सुंदर शब्दात केला आहे पहा, हे वरील विधानावरून दिसून येते आणि म्हणूनच ‘शिक्षणास आयुष्य वाहणारा अमर असतो’, हे हजरत पैगंबराचे वचन या आधुनिक आणि वैज्ञानिक जगात माणसाच्या प्रगतीसाठी ‘दीपस्तंभच’ म्हणावा लागेल. पाकिस्तानमध्ये जन्मलेली मलाला युसुफजार्इ आतंकवादाचा धिक्कार करून जेव्हा लेखणीचे महत्त्व सांगते, तेव्हा तिला वयाच्या १७व्या वर्षी जगातील सर्वांत श्रेष्ठ ‘नोबेल शांतता पुरस्कार’ मिळतो, हे कशाचे द्योतक आहे. १५०० वर्षानंतर हजरत पैगंबराचे वचन सत्यामध्ये आलेले पाहून हजरत पैगंबराच्या र्इश्वरीय वाणीची सत्यता येते.
रमजान महिन्यात पवित्र कुराणचे पठण करावयाचे असते. त्याद्वारे हजरत पैगंबराचा हा प्रेरणादायी विचार मुस्लिम तरुणापर्यंत पोहोचतोय, हे विशेष!

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत)
इफ्तार : ६.५७ शनिवार सायंकाळी
सहेरी : ५.०८ रविवार सकाळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com