अमली पदार्थांची विक्री करणारा अटकेत

अमली पदार्थांची विक्री करणारा अटकेत

पुणे, ता. २७ : सदाशिव पेठेत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून पाच लाख १९ हजारांचे चरस आणि तलवार, कुऱ्हाड, चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सागर सुभाष मोडक (वय ४३, रा. ऑर्चिड बिल्डिंग, नातूबाग, १३६७, सदाशिव पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सदाशिव पेठेतील नातूबाग परिसरात एक जण चरसची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिस कर्मचारी अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोडकला पकडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे असल्याचे उघडकीस आले. मोडकविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंके, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com