सोन्याचा चांदीच्या भावात वाढ आणि पुन्हा घट

सोन्याचा चांदीच्या भावात वाढ आणि पुन्हा घट

सोने, चांदीच्या इमेज टाकणे
---

सोने-चांदी ग्राहकांसाठी महिना फायदेशीर
वाढते व्याजदर, सरत्या लग्नसराईमुळे भावात चढउतार

पुणे, ता. २८ : भाव कमी झाल्यानंतर सोन्या-चांदीची खरेदी करू या आशेवर असलेल्यांसाठी तसेच आता सोने खरेदी करू, नंतर किंमत वाढेल अशी भावना असलेल्या दोन्ही प्रकार ग्राहकांसाठी मे महिना फायदेशीर ठरला आहे. कारण या महिन्याच्या सुरवातीच्या १५ दिवसांत भावात वाढ झाली. त्यानंतर पुन्हा भावात घट झाली आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरवातीलाच असलेले भाव कमी-अधिक प्रमाणात महिना अखेर कायम राहिले आहेत.
बँकांचे वाढलेले व्याजदर, लग्नसराई संपत आल्याने कमी झालेली खरेदी अशा काही कारणांमुळे भावात चढउतार होत आहे. मे महिन्याच्या सुरवात २२ कॅरेट सोने ५५७४ रुपये तर २४ कॅरेट सोने ५९८९ रुपये प्रतिग्रॅम होते. तर चांदी ७५ हजार रुपये किलो होती. सोन्याच्या भावात १५ मेपर्यंत सातत्याने थोडी थोडी वाढ होती राहिली. त्यामुळे २२ कॅरेट सोने ५७२४ रुपये तर २४ कॅरेट सोने ६१५० रुपये प्रतिग्रॅम झाले होते. मात्र त्यानंतर किंमत पुन्हा हळूहळू कमी होत गेली. त्यामुळे सध्या दर महिन्याच्या सुरवातीला असलेल्या भावाच्या प्रमाणात आले आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत मेमध्ये सोने प्रतिग्रॅम ५०० रुपयांपर्यंत वाढले आहे.

चांदीच्या किमतीत चढउतार

चांदीच्या किमतीत या महिन्यात मोठ्या प्रमाणात चढउतार झाला आहे. महिन्यांच्या सुरवातीला ७५ हजार रुपये किलो असलेली चांदी ७२ हजार रुपये किलो झाली आहे. मात्र दरम्यानच्या काळात हे दर ७४, ७५, ७६,७२ आणि ७३ हजार रुपये झाले होते. एक एप्रिलला चांदी ६५ हजार रुपये प्रतिकिलो होती. त्यात सुमारे आठ हजार रुपये वाढ होत, चांदी आता ७२ हजार रुपये किलो झाली आहे.

मे महिन्यातील सोने चांदीचे भाव (प्रति एक ग्रॅम)
तारीख - सोने २२ कॅरेट - २४ कॅरेट - चांदी
१ - ५६४९.४० - ६०७०.१० - ७५.२०
२- ५६३५.३० - ६०५५.०० - ७४.५०
३ - ५७१५.२० - ६१४०.८० - ७५.६०
४- ५७७१.६० - ६२०१.४० - ७६.६०
५ - ५७८१.०० - ६२११.५० - ७७.४५
६ - ५७१०.५० - ६१३५.८० - ७६.४५
७ - ५७१०.५० - ६१३५.८० - ७६.४५
८ - ५७२४.६० - ६१५०.९०- ७६.८२
९ - ५७४३.४० - ६१७१.१० - ७६.४५
१० - ५७६२.२० - ६१९१.३० - ७६.६०
१५ - ५७२४.६० - ६१५०.९० - ७३.५५
२८ - -५६३५.30 - ६०५५ - ७१.९०
(स्रोत ः कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स)
-----

गेल्या काही दिवसांत बँकांचे व्याजदर वाढले आहेत. त्यामुळे भाव कमी झाले आहेत. सोने खरेदी करायचे असेल तर सध्या चांगली संधी आहे.
- विपुल अष्टेकर, संचालक, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com