Missing Girls
Missing Girlssakal

Pune Crime : चौदावं वरीस धोक्याचं! मुलगी बाहेर जाऊन येते म्हणून सांगून गेली, ती अद्याप घरी परतलेली नाही

मुलीचे वय वर्षे १४. मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून ती २४ मे रोजी घराबाहेर पडली. परंतु ती अद्याप घरी परतली नाही.

पुणे - धायरी परिसर... मुलीचे वय वर्षे १४. मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून ती २४ मे रोजी घराबाहेर पडली. परंतु ती अद्याप घरी परतली नाही. आईने काळजीपोटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली... पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात अशा प्रकारे मागील सुमारे अडीच वर्षांत १ हजार २३३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी ६६३ मुली घरी परतल्या असून, अद्याप ५५० मुली बेपत्ताच असल्याचे समोर आले आहे. यात १४ ते १७ वर्षे वयोगटांतील मुलींचे प्रमाण अधिक आहे. मात्र यात मानवी तस्करी तसेच धार्मिक किंवा जातीयता असा काही प्रकार आढळून आला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वडगाव बुद्रुक भागातील १५ वर्षांची मुलगी खेळायला जाते म्हणून घराबाहेर गेली. आमिष दाखवून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने सिंहगड पोलिस ठाण्यात दिली आहे. कोथरूड परिसरातून दुपारी एका १३ वर्षांच्या मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. वारज्यात १७ वर्षांची मुलगी बाहेर जाऊन येते म्हणून सांगून गेली, तीही अद्याप घरी परतलेली नाही. येवलेवाडी परिसरातून १२ वर्षांच्या मुलाला पळवून नेल्याची तक्रार कोंढवा पोलिसांनी दाखल केली आहे. बुधवारी (ता. २४) एकाच दिवशी या वेगवेगळ्या घटनांमध्ये चार मुली, एक मुलगा असे पाच जण घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या पाच जणांसह मागील आठवड्यात वेगवेगळ्या कारणांमुळे दहा अल्पवयीन मुलींसह तीन मुले बेपत्ता झाल्याची पोलिसात नोंद आहे.

मागील आठवड्यातील घटना (२० मे ते २५ मे २०२३) -

स्थळ-मुलीचे वय-गुन्हा दाखल-पोलिस ठाणे

- मंगळवार पेठ-१४ वर्षे-फरासखाना

- कदमवाक वस्ती-१७ वर्षे-लोणी काळभोर

- डोंगरगाव (ता. हवेली)-१६ वर्षे-लोणीकंद

- वारजे (दोन मुले)-१७ वर्षे-वारजे

- कात्रज-१८ वर्षे-भारती विद्यापीठ

- कोथरूड-१४ वर्षे-कोथरूड

- गणेश पेठ-१७ वर्षे-फरासखाना

काही घटनांमधून समोर आलेली निरीक्षणे -

१. प्रेमप्रकरण

- प्रेमसंबंध असणे किंवा आई-वडिलासोबत क्षुल्लक वादातून घरातून निघून जाणे.

२. हट्टी स्वभाव

- काही लहान मुले-मुली हट्टी स्वभावाची असतात. त्यातून बऱ्याचदा मुले घरी न सांगता बाहेर मित्रमैत्रीण किंवा नातेवाइकांकडे जातात. त्यापैकी काही मुले-मुली दोन-तीन दिवसांत घरी परत येतात.

३. सोशल मीडियातून आकर्षण

- मोबाइलवर सोशल मीडियाचा मुक्त वापर होतो. या वयात मुले-मुली तारुण्यात येत असतात. प्रेमाच्या आकर्षणातून आमिषाला बळी पडून लहान मुली गैरमार्गावर जाण्याची शक्यता असते.

४. पालकांचे दुर्लक्ष

- आई-वडील कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याने मुला-मुलींकडे दुर्लक्ष होते.

५. इतर कारणे

घरातील वातावरण, आर्थिक परिस्थिती, व्यसनापोटी घरात सतत भांडण, शिक्षणाचा अभाव, संगत

Missing Girls
Land Acquisition : कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादन ऑक्टोबरपूर्वी करणार - विक्रम कुमार

पुण्यात मानवी तस्करी नाही

बहुतांश अल्पवयीन मुली प्रेमप्रकरणातून निघून गेल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु काही मुले-मुली हट्टी स्वभावाची असतात. किरकोळ वादातून घराबाहेर जातात. ते दोन-तीन दिवसांत घरी परत येतात. काही अल्पवयीन मुली १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर घरी परततात. मानवी तस्करी तसेच धार्मिक किंवा जातीयता असा काही प्रकार आढळून आलेला नाही. प्रामुख्याने गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि पालकांचे दुर्लक्ष ही कारणे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

समुपदेशकांचा पालकांना सल्ला

- पालकांनी मुलांसोबत सुसंवाद साधावा

- मुलांसोबत मैत्रीचे नाते जपण्यासोबत आदरयुक्त धाकही आवश्यक

- मुलांचे मित्र-मैत्रीण कोण आहेत, हेही पाहणे महत्त्वाचे

- पालकांनी मुलांवर योग्य संस्कार होतील, असे स्वत:चे वर्तन ठेवावे

- कुटुंबातील व्यक्तींनी मुलांसमोर वाद टाळावेत

- गरज भासल्यास योग्य समुपदेशकाकडून सल्ला घेणे गरजेचे

- मुलांना मारहाण न करता समजावून सांगावे

Missing Girls
Electricity Connection : पुणे जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा

पालकांनी मुलांसमोर वाद टाळावेत. वाद असले तरी मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळाले पाहिजे. मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवणे शक्य नसले तरी ते काय पाहतात, यावर लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा. कुटुंबासमवेत एकत्र जेवण, सुटीत मुलांसोबत एकत्रित बाहेर जावे. जेणेकरून मुले-मुली इतर प्रलोभनापासून दूर राहतील.

- डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय

पुणे शहरातील घटना (१ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत)

वर्ष बेपत्ता मुली घरी परतल्या घरी न परतलेल्या मुली

२०२१ ५१३ २८६ २२७

२०२२ ५६६ २८४ २८२

२०२३ १३४ ९३ ४१ (३० एप्रिलपर्यंत)

एकूण १२३३ ६६३ ५५०

(गुन्हे शाखेकडील आकडेवारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com