कचरा वाहतुकीसाठी ई-ट्रक घेण्यास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा वाहतुकीसाठी 
ई-ट्रक घेण्यास मान्यता
कचरा वाहतुकीसाठी ई-ट्रक घेण्यास मान्यता

कचरा वाहतुकीसाठी ई-ट्रक घेण्यास मान्यता

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : पुणे महापालिकेने अधिकाऱ्यांसाठी ई-कारचा वापर सुरू केलेला असताना आता कचरा वाहतुकीसाठी ई-ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे. १० ट्रक घेण्यासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाला आहे. त्या माध्यमातून कचरा वाहतुकीसाठी ई-ट्रक विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. शहरात सध्या घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित करून तो रॅम्पवर आणला जातो. तेथून तो मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये भरून प्रकल्पांवर नेला जातो.

घंटागाडीमार्फत एका वेळी ६०० ते ७०० किलो कचरा गोळा केला जातो व त्यासाठी प्रति किलोमीटर सुमारे ६ रुपये खर्च येतो. हा खर्च कमी करणे व वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी यासाठी हा निर्णय घेतला आहे. या ट्रकचा वाहतूक खर्च प्रति किलोमीटर सुमारे ७० पैसे इतका आहे व एका वेळी दीड टन कचऱ्याची वाहतूक करणे याद्वारे होते. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर १३० किलोमीटरपर्यंत हा ट्रक धावू शकतो. त्यामुळे शहराच्या सर्व भागांत, कचरा रॅम्पपासून लांब असलेल्या भागातही हा ट्रक कचरा संकलनासाठी पाठविता येणे शक्य आहे. या एका ट्रकची किंमत सुमारे १६.४५ लाख असून, जीएसटीसह याचा खर्च १.७२ कोटीपर्यंत गेला आहे. ट्रकच्या चार्जिंगसाठी गुलटेकडी येथील महापालिकेचा वाहन डेपो, विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था केली जाणार आहे.