विमानतळावरील बसचा अपघात

विमानतळावरील बसचा अपघात

पुणे, ता. ५ ः पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या विमानाच्या प्रवाशांना ‘टॅक्सी वे’वरून विमानाच्या दिशेने जाणाऱ्या बसचा शुक्रवारी पहाटे अपघात झाला. बसच्या चालकाने बॅगेज लोडर वाहनाला धडक दिली. त्यामुळे बसच्या समोरील काचेचे तुकडे झाले. यातील काही तुकडे दोन प्रवाशांच्या हातात घुसल्याने त्यांना किरकोळ स्वरूपाची इजा झाली. टर्मिनलमध्ये जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांनतर विमानाने गोव्याकडे उड्डाण केले.
पुण्याहून गोव्याला जाणारे हे इंडिगोचे विमान होते. ही घटना शुक्रवारी ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास घडली. पहाटे पाचच्या सुमारास प्रवाशांना घेऊन हे विमान गोव्यासाठी झेपावले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.
पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसांत वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. ग्राउंड स्टाफकडून अशा घटना घडू नयेत म्हणून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले होते. मात्र अद्याप तरी कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com