बहिणींनो डरना मना है ः सुप्रिया सुळे

बहिणींनो डरना मना है ः सुप्रिया सुळे

Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ : ‘काश्मीर ते कन्याकुमारी आपला भारत एक असल्याचे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. हे सरकार कॉपी करून आलेले आहे. लोकसभा निवडणुकीत महिला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी कितीही धमक्या दिल्या तरी बहिणींनो डरना मना है, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर शाखेतर्फे खासदार डॉ. अमोल कोल्हे व खासदार सुप्रिया सुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जाहेद सय्यद, नीलेश मगर, योगेश ससाणे, रवींद्र माळवदकर, हेमंत बधे, वंदना मोडक, सविता मोरे, रूपाली शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी शैलेश बेल्हेकर आणि शादाब खान यांनी पक्षात प्रवेश केला.
‘केंद्रात भाजपचे सरकार नसून महागाई , बेरोजगार, भ्रष्टाचाराचे सरकार आहे,’ अशी टीकाही सुळे यांनी केली. डॉ. कोल्हे म्हणाले,‘‘हा देश तुमचा- आमचा सर्वांचा आहे. जातिभेदाच्या भिंती तोडून देश एकसंध कसा राहील हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ज्या विश्वासाने मतदारांनी मला मतदान केले आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.’’
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com