Pune Traffic Changes Maghi Ganesh
Pune Traffic Changes Maghi Ganeshesakal

Pune Traffic Changes Maghi Ganesh: गणेश जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल, या मार्गाचा करा वापर..

Pune Traffic News: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक संथ होण्याची शक्यता असते

पुणे, ता. १२ : गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १३) शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीच्या परिस्थितीनुसार बदल करण्यात येणार आहेत.


श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक संथ होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी बदल करणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

असा राहील वाहतुकीत बदल ः पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक (अलका टॉकीज) चौक आणि पुढे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने (फर्ग्युसन रस्ता) जावे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक- टिळक चौकातून पुढे टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करून ती बाजीराव रस्त्याने सरळ सोडण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com